अरुंद रस्त्यांवरील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बुलेट ठरणार उपयुक्त
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
परभणी महानगरपालिकेच्या वर्धानपन दिनानिमीत्त अग्निशमन दलासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य अग्निशामक सेवा संचालनालय, मुंबई यांच्याकडून १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून दोन फायर बुलेट वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. रविवारी महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
यावेळी माजी सभापती अतुल सरोदे,सहायक आयुक्त शेजुळ,अग्निशमन विभागप्रमुख दिपक कानोडे,समाजकल्याण अधिकारी राजकुमार जाधव,उमेश जाधव,रमेश चव्हाण,अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
परभणी शहरातील अनेक भागांत अरुंद रस्ते असल्यामुळे मोठ्या अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचताना अडचणी निर्माण होतात. अशा परिस्थितीत लहान स्वरूपाच्या आगीवर तातडीने नियंत्रण मिळविण्यासाठी या फायर बुलेट वाहनांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे शहरातील आपत्कालीन अग्निशमन सेवेला अधिक गती मिळणार आहे.रविवार, दिनांक १ नोव्हेंबर रोजी वर्धापन दिनाच्या निमित्ताने या दोन्ही फायर बुलेट वाहनांचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या नवीन फायर बुलेट वाहनांमुळे शहरातील अरुंद गल्लीबोळांमध्ये उद्भवणाऱ्या आगीच्या घटनांवर तातडीने नियंत्रण मिळविण्यास मदत होणार असून, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या सुविधेत महत्त्वाची भर पडली आहे.यावेळी महापौर सय्यद इकबाल अतुल सरोदे यांनी वाहन चालवत फेरी मारली.
No Comment! Be the first one.