देहविक्रयाच्या रॅकेटचा पर्दाफाश, दोन्ही लॉजमधील 7 जणांविरुद्ध PITA कायद्यान्वये गुन्हे दाखल
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध देहव्यापाराच्या व्यवसायाविरोधात सदर बाजार पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉज आणि न्यू बॉम्बे वडा पाव सेंटर मधून आत जाणाऱ्या आतील लॉजमध्ये पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अचानक छापे टाकून कथित देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, दोन्ही लॉजमधील एकूण सात जणांविरुद्ध PITA कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील मोक्ष लॉज आणि न्यू बॉम्बे वडा पाव सेंटर मधून आत जाणाऱ्या आतील लॉजमध्ये बेकायदेशीररीत्या देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. त्यानंतर दोन्ही लॉजवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले.
या धडक कारवाईदरम्यान पोलिसांनी चार पीडित महिलांची सुटका केली. तसेच या प्रकरणात दोन्ही लॉजमधील एकूण सात संशयित आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.,,
वारंवार कारवाई, तरीही मोक्ष लॉजवरील कथित अवैध धंदे सुरूच
या संपूर्ण प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, मोक्ष लॉजवर यापूर्वीही सदर बाजार पोलिसांनी अनेकदा छापे टाकून कारवाई केली आहे. मात्र, पोलिसांच्या वारंवार कारवाया होऊनही या लॉजमधील कथित बेकायदेशीर व्यवसाय थांबण्याचे नाव घेत नसल्याचे समोर येत आहे.
त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने लक्ष केंद्रित केले असून, संबंधित लॉजचालक आणि आरोपींविरोधात आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.,,
मोक्ष लॉजवर मोक्काचा बडगा उगारणार आहे.
यासंदर्भात सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
वारंवार कारवाई करूनही संबंधित ठिकाणी अशा प्रकारच्या बेकायदेशीर हालचाली सुरूच राहत असल्याने, संबंधित लॉजचालक आणि आरोपींविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का (MCOCA) किंवा अन्य कठोर कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई करता येईल का, याची कायदेशीर पडताळणी पोलीस प्रशासनाकडून केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कायद्याच्या चौकटीत आवश्यक निकष पूर्ण होत असल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.,,
संदीप भारती{ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे
No Comment! Be the first one.