लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी
खुलताबाद : दौलताबाद येथील घाटातील डोंगराला बुधवारी दुपारी अचानक भीषण आग लागल्याने परिसरात वनसंपदा आणि जैवविविधतेला मोठा फटका बसला. डोंगरावरील झाडे झुडपे गवत आगीत जळून खाक झाली. नैसर्गिक अधिवास आगीच्या भक्षस्थानी पडल्याने जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या परिसरात सरपटणारे प्राण्यांचा अनेक लहान वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. बुधवारी दुपारी अचानक आग लागल्याने डोंगर परिसरातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठत होते. आगीमुळे डोंगरावरील नैसर्गिक संपत्तीची मोठे नुकसान झाले असून पर्यावरणाच्या दृष्टीने चिंताजनक बाब आहे. वनसंपदेचे संरक्षण वन्यजीवांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आगीवर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
दौलताबाद घाटातील डोंगरातील आगीमुळे जैव संपत्तीचे मोठे नुकसान झाले आहे. दौलताबाद घाटातील डोंगराला दिवसा आग लागण्याचे प्रकार घडू लागले आहे. डोंगर पेटू लागल्याने नैसर्गिक जैविक आणि होऊ लागली आहे. जंगली वनस्पती, झाडे – झुडपे, जंगली झाडे आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे. दौलताबाद घाटात जंगलांना अज्ञात लोकांकडून आग लावण्याचा प्रकारांमुळे जंगल संपत्तीवर मोठ्या प्रमाणात आघात होऊ लागला असून डोंगर पेटवल्याने जंगली प्राणी पशुपक्षी यांचे जीवन धोक्यात आले आहे. एकीकडे झाडे लावा झाडे वाचवा असा नारा दिला जातो तर दुसरीकडे डोंगर पेटवून नैसर्गिक संपत्तीचे नुकसान केली जात आहे. दौलताबाद घाटातील डोंगरावर बुधवारी दुपारी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी जंगलाला आग लागल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असून या आगीत जंगली झाडे गवताच्या गंजा पशुपक्ष्यांचे घरटे जळून खाक झाले आहे. पक्षांची संख्या हळू कमी होऊ लागली असून जंगली लांडगे, ससे, साप, कोल्हे यांची संख्या कमी होऊ लागली आहे. चिमण्या, कावळे, रानपक्षी यांचे भक्ष मिळत नाही. पशुपक्ष्यांची झाडावरील घरटी जळून खाक झाली आहे. डोंगरांना आग लागल्यामुळे सरपटणारे प्राणी मृत्युमुखी पडत असून लहान मोठे झाडे झुडपे जळून खाक झाले आहे. त्यामुळे जंगल वाचवा हा विचार नष्ट होताना दिसत आहे. डोंगरांना आग लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होते. त्यामुळे डोंगरी भागात गवत वाढण्याची क्षमता कमी होते. गवत कापल्यानंतर डोंगरांना आग लावून झाडे झुडपे पेटवून दिले जातात. त्यामुळे औषधी वनस्पती जळून खाक होतात. पशुपक्ष्यांचा निवारा नष्ट होऊ लागला आहे. परिणामी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात दुपारी यश आले.
No Comment! Be the first one.