आमदार मा. सईद भैय्या खान यांच्या नेतृत्वाखाली पाथरी येथे लवकरच भव्य-दिव्य साई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार!
लोकार्थ प्रतिनिधी
आज दिल्ली येथे पाथरी नगरपरिषदेच्या शिष्टमंडळाने माजी राष्ट्रपती मा. श्री. रामनाथजी कोविंद यांची जनपथ मार्ग येथील निवास्सथानी सदिच्छा भेट घेऊन पाथरी येथील साई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या उद्घाटन सोहळ्याचे विशेष निमंत्रण दिले. यावेळी नगराध्यक्ष मा. आसिफ भैय्या खान व शिष्टमंडळाने राष्ट्रपती महोदयांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. राष्ट्रपती महोदयांनी यापूर्वी पाथरी शहराला दिलेल्या भेटीतील आठवणींना उजाळा देत सर्वांशी आत्मीयतेने संवाद साधला. तसेच उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक सहमती दर्शवली.
पाथरीच्या साई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी मंजूर झालेला ९१ कोटी ८० लाख ९४ हजार रुपयांचा निधी तत्कालीन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आणि आमदार मा. सईद भैय्या खान यांच्या विशेष प्रयत्न व पाठपुराव्यामुळे मंजूर झाला. या विकास आराखड्याच्या मंजुरीच्या प्रक्रियेत तत्कालीन राष्ट्रपती मा. रामनाथजी कोविंद यांचेही विशेष योगदान राहिले आहे.
याप्रसंगी नगराध्यक्ष मा. आसिफ भैय्या खान, उपनगराध्यक्ष मा. आलोक चौधरी, मुख्याधिकारी मा. काकासाहेब डोईफोडे, नगरसेवक मा. अनिलराव ढवळे, उद्धवराव नाईक, खालिद बिन हावेल, गोविंदराव हरकळ, अमोल भालेपाटील, साजेद अली राज तसेच साई विश्वस्त समितीचे अध्यक्ष ॲड. अतुल चौधरी व विश्वस्त श्री. संजय भुसारी उपस्थित होते.
पाथरीच्या विकासाचा ऐतिहासिक क्षण जवळ आला आहे! आमदार मा. सईद भैय्या खान यांच्या नेतृत्वाखाली लवकरच हा भव्य-दिव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून, हा क्षण समस्त पाथरीकरांसाठी अभिमानाचा ठरणार आहे!
No Comment! Be the first one.