लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे
केज :- शहरातील लक्ष्मी नगर सोसायटी येथे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (ता. १०) सकाळी दहा वाजता विठ्ठल – रुक्मिणी मूर्तीची स्थापना व अनावरण रमाकांत बापू मुंडे व उषाताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आली.
शहरातील प्रशस्त वसाहत म्हणून ओळख असलेल्या लक्ष्मी नगर सोसायटीमध्ये सोसायटीच्या स्थापनेवेळी बारा गुंठे क्षेत्र मंदिर व क्रीडांगणासाठी रमाकांत बापू मुंडे यांनी राखीव ठेवले होते. मंगळवारी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून विठ्ठल – रुक्मिणी मूर्तीची स्थापना व अनावरण रमाकांत बापू मुंडे व उषाताई मुंडे यांच्या हस्ते अभिषेक व विधीवत पूजा करून करण्यात आली.
यावेळी बोलताना रमाकांतबापू मुंडे म्हणाले की, सोसायटी स्थापनेवेळी मंदिर स्थापनेचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण करून ऋणातून मुक्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रस्ते नाल्या वीज आणि लक्ष्मी नगरच्या ओपन स्पेसचे सुशोभीकरण करून भव्य मंदिर उभा करण्याचे मानस ही त्यांनी व्यक्त केला. तर उषाताई मुंडे म्हणाल्या की, लक्ष्मी नगर सोसायटी एक आदर्श सोसायटी म्हणून केज शहरात गणली जावी अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमास दहिफळ (वडमाऊली) येथील माजी सरपंच बाळासाहेब मोराळे, मधुर भैय्या मुंडे, दत्ता घुले, डॉ. अजित तांदळे, बंडू घुले, दत्ता ठोंबरे, भारत हांगे, विलास ठोंबरे, राजाभाऊ घोळवे, रवी मुंडे, सुनील मोरे भागवत सोनवणे, सचिन घोळवे, गायकवाड सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
No Comment! Be the first one.