लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा यांसह अन्य रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवली जात असल्याच्या प्रकारावर मनसेने आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा व संस्कृतीला प्राधान्य द्यावे, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
या प्रकरणाची चौकशी करून रेल्वे प्रशासनाला योग्य सूचना द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हा संघटक अशोक पवार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी अशोक कराळे पाटील, बाळासाहेब बोजवारे पाटील, विठ्ठल बनकर, मुकेश मालोदे पाटील, रमाकांत निकम पाटील यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते
No Comment! Be the first one.