आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची कसरत;
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : शहरातील हर्सूल येथील कचरा डेपोला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीने मोठे स्वरूप धारण केल्याने ती आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत करावी लागली.
प्राथमिक माहितीनुसार, आग विझवण्यासाठी आतापर्यंत ३५ ते ४० पाण्याच्या टँकरचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमधून आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
हर्सूल डेपोला यापूर्वीही लागली होती आग
हर्सूल कचरा डेपोला आग लागण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी २० जून २०२२ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास डेपोतील पत्र्याच्या शेडमधील कचऱ्याला भीषण आग लागली होती. या आगीत कचऱ्याचे शेड पूर्णपणे जळून खाक झाले होते, तर कचरा प्रक्रिया करणाऱ्या दोन बेलिंग मशीनचेही नुकसान झाले होते. त्यावेळी नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली होती.
No Comment! Be the first one.