लोकार्थ प्रतिनिधी गोपाल सातपुते
हिंगोली – मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २२व्या लोकसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचा प्रतिष्ठेचा यंदाचा लोकसंवाद जीवन गौरव पुरस्कार राज्यपाल पुरस्काराप्राप्त पूर्व शिक्षणाधिकारी, शिक्षणतज्ञ शिवाजीराव पवार यांना जाहीर झाला आहे.
शिवाजीराव पवार यांनी शिक्षणाधिकारी म्हणून मराठवाड्यात केलेले कार्य उल्लेखनीय अशा प्रकारचे असून त्यांनी हिंगोली जिल्ह्याला त्यांच्या कार्यकाळात डिजिटल शिक्षणाच्या बाबतीत परिपूर्ण केले या त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यपालांनी पुरस्काराने सन्मानित केले होते. स्काऊट गाईडच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर कार्य केले आहे. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक असून या माध्यमातून आजही ते केजी टू पीजी पर्यंतचे ज्ञान देण्यासाठी अविरत प्रयत्नशील असतात. मराठवाड्याच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात त्यांचे योगदान अनमोल अशा प्रकारचे आहे. त्याबरोबरच हिंगोली जिल्हा कुस्ती महासंघ यांच्या माध्यमातूनही ते खूप कार्य करतात .अशा त्यांच्या सर्वश्रुत कार्याची दखल घेत त्यांना २०२६ लोकसंवाद जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
हा पुरस्कार दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी संपन्न होणाऱ्या लोकसंवाद साहित्य संमेलनात नामदार हेमंत पाटील, साहित्यिक विचारवंत शेषरावजी मोरे, संमेलनाध्यक्ष साहित्यिक आसाराम लोमटे, मराठी भाषा साहित्य महामंडळ मुंबईचे सदस्य साहित्यिक देविदास फुलारी, कथाकार दिगंबर कदम, साहित्यिक प्रा. महेश मोरे इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे.
No Comment! Be the first one.