आरोपींच्या शोधासाठी तीन पोलिस पथके तैनात
लोकार्थ प्रतिनिधी गौतम बचुटे, केज :–
पशु पालकांच्याकडे कानाला असलेला एका १८ वर्षाच्या तरुणाने मालक आणि त्याचा भाऊ यांच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याचे इन कॅमेरा शवविच्छेदन झाल्या नंतर संतप्त नातेवाईक आणि कार्यकर्त्यांनी त्याच्या आत्महत्येची संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी. या मागणीसाठी प्रेत पोलिस ठाण्यात आणल्याने तणाव निर्माण झाला होता.
दि. २७ नोव्हेंबर रोजी मालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या सिद्धनाक रवि सिरसट याच्या मृत्यूशी संबंधित असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी मयताच्या संतप्त नातेवाईकांनी शवविच्छेदना नंतर प्रेत पोलिस ठाण्यात आणले होते. या वेळी मोठ्या प्रमाणात नातेवाईक आणि दलीत चळवळीतील कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम यांनी फरार आरोपींच्या शोध सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रेत अंतिम संस्कारासाठी टाकळी येथे घेऊन गेले.
काय आहे प्रकरण ? :-
दि. २६ नोव्हेंबर रोजी सिद्धनाक सिरसट (रा. टाकली ता. केज) याने केज येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या अखिल खतीब यांच्या पत्र्याच्या शेड मध्ये असलेल्या लोखंडी अँगलला म्हशीच्या म्होरकीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मयत सिद्धनाक रवि सिरसट हा तरुण केज येथील अखिल खतीब खलील खतीब यांच्याकडे जनावरे सांभाळण्याचे काम करीत होता. सिद्धनाक याचे वडील रवि सिरसट आणि कुटुंबियांचा विरोध होता. तरी सुद्धा अखिल खतीब त्याला पैशाची लालुच दाखवून बळजबरीने त्याच्याकडून काम करून घेत होते आणि त्याला कामाचे पैसे सुद्धा देत नव्हते. अखिलचा लहान भाऊ मुस्तकिन खलील खतीब हा त्याच्याकडून म्हशी धुवून घेणे, शेण काढणे व गोठा झाडून साफ करणे अशी कामे बळजबरीने काम करुन घेत असे.
त्यांच्या या त्रासाला कंटाळून दि. २६ नोव्हेंबर रोजी सिद्धनाक सिरसट याने केज येथील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या अखिल खतीब यांच्या पत्र्याच्या शेड मध्ये असलेल्या लोखंडी अँगलला म्हशीच्या म्होरकीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
दोन्ही भावा विरुद्ध गुन्हा दाखल :-
मयत सिद्धनाक सिरसट याचे वडील रवी सिरसट यांच्या तक्रारी वरून अखिल खलील खतीब आणि मुस्तकिन खलील खतीब यांच्या विरुद्ध गु. र. नं. ७३२/२०२६ भा न्या सं १०८ आणि ॲट्रॉसिटीचे कलम ३(२), ३(v) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम हे तपास करीत आहेत.
कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका :-
सिद्धनाक सिरसट याच्या मृत्यू प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच दलीत कार्यकर्ते आणि कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेतली आणि गुन्हा दाखल होई पर्यंत शवविच्छेदन करण्यास नकार दिल्याने पोलिसांनी ॲट्रॉसिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून घेतला.
तीन पोलिस पथके रवाना :-
आरोपींच्या शोधासाठी तीन पोलिस पथके तैनात रवाना झाले असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रेत अंतिम संस्कारासाठी टाकळी येथे घेऊन गेले.
सुमारे २८ तासा नंतर अंत्यविधी :-
सिद्धनाक याच्या मृत्यू नंतर सुमारे २८ तासांनी टाकळी येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी दलीत चवळीतील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शोकाकुल आई आणि वडील यांचा आक्रोश :- अंत्यविधी वेळी सिद्धनाक याची आई राणी, वडिल रवी, भाऊ आणि घरातील नातेवाईक यांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे हृदय पिळवटून जात होते.
No Comment! Be the first one.