८० हजारांचा ऐवज लंपास; सिडको एमआयडीसी पोलिसांत गुन्हा
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : कारचा धक्का लागल्याचा बनाव करून व्यापाऱ्याला थांबवले. तडजोडीच्या नावाखाली १,५०० रुपये घेतल्यानंतर त्याच भामट्याने लिफ्ट मागून कारमध्ये प्रवेश केला आणि निर्जन ठिकाणी नेऊन व्यापाऱ्याला लुटल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
गंगाधर काशीनाथ पाटील (वय ५१, रा. बाळकृष्णनगर, गारखेडा) हे रात्री सिडको बसस्थानकाजवळून कारने जात असताना दुचाकीवरील महिला व पुरुषाने अपघाताचा बनाव केला. त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने तडजोड करून दिल्यानंतर ‘प्रोझोन मॉलपर्यंत सोडा’ असे सांगत लिफ्ट घेतली. पुढे कलाग्रामजवळून फ्लचर कंपनीसमोर कार थांबवून त्याने पाटील यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि १५ हजारांची रोकड असा ८० हजारांचा ऐवज हिसकावला.
दरम्यान, काळ्या दुचाकीवरून आलेल्या साथीदारासोबत तो पसार झाला. याप्रकरणी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करीत आहेत.
No Comment! Be the first one.