लोकार्थ प्रतिनिधी
मुंबई – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान ‘जलसा’, मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) आणि वरळी रेसकोर्स यांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या चार महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल मुंबई उच्च न्यायालयाला प्राप्त झाला होता. या ई-मेलमध्ये अमिताभ बच्चन यांचा बंगला ‘जलसा’, मुंबई उच्च न्यायालय आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजसह वरळी रेसकोर्सला लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
No Comment! Be the first one.