लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकड हैदराबाद गॅझेटचा सुधारित जीआर काढावा, तसेच मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना धमकावणे चुकीचे असून समाजाने संयम राखावा, असे आवाहनही जरांगे यांनी केले. आरक्षणाच्या लढाईत आपण आणि समाज कधीही मागे हटणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी राज्यातील प्रत्येक शेतकरी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी केली. दरम्यान, प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आराम न करता शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दसऱ्यानिमित्त नारायणगडावर दर्शनासाठी मराठवाड्यासह खानदेश, विदर्भ, पुणे व पश्चिम महाराष्ट्रातील समाजबांधवांनी यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
No Comment! Be the first one.