अध्यक्ष व सचिवांच्या अर्वाच्च भाषेमुळे संचालक व सभासद संतापले
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
नांदेड -जिल्हा परिषदेच्या शिक्षण पतपेढी सर्वसाधारण सभा प्रचंड गदारोळ व अर्वाच्च शिवीगाळ व धक्काबुक्की मुळे गाजली असून अध्यक्ष व सचिवांच्या मनमानीमुळे सभा गुंडाळण्यात आली. दरम्यान विरोधी सदस्यांनी सदर घटनेचा निषेध केला असून भ्रष्टाचारांचे बिंग फुटल्यामुळे सर्वसाधारण सभा गुंडाळली असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान सदर सर्वसाधारण सभेत झालेली धक्काबुक्की ही चर्चेचा विषय ठरला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड येथे अतिशय गदारोळाच्या वातावरणात पार पडली आहे.
वार्षीक आमसभेच्या दुसऱ्या सत्रामधे पतसंस्थेतील नियमबाह्य बेकायदेशीर नौकरभरती वरुण सभासदानी सताधाऱ्यांना धारेवर धरले. नविन भरती केलेल्या लेखापालला अवघ्या सहा महिन्यात बेकायदेशीर व नियमबाह्यरीत्या अवघ्या सहा महिन्यात माध्यमिक शिक्षकाना असणारी वरिष्ठ वेतनश्रेणी लागू केली. त्यामुळे पतसंस्थेच्या सभासदांच्या लाखो रुपयांची लूट हे सत्ताधारी करत आहे. वार्षीक आमसभा अमर्याद खर्च 6 लाख 56 हजार खर्चीसह अवैध कर्मचारी भरतीमुळे पगारापोटी 56 लाख रुपये खर्च अशा असंख्य आर्थिक उधळपट्टी रोषाला सत्ताधारी संचालक मंडळाला सामोरे जावे लागले. सहकारी शिक्षण पतसंस्था हि शतकपुर्तीकडे जात असताना या ऐतिहासिक पतसंस्थेच्या संपूर्ण भ्रष्टाचाराने ग्रासले आहे. मागील काळात पतसंस्थेचे संगणकीकरण करून पतसंस्था सभासद वसुली होण्यासंदर्भात सभासदच्या वेतनातून एकाच दिवशी कपात व्हावी व पतसंस्थेच्या कर्जपुरवठा सूरळीत व्हावा. या उदेशाने मागिल संचालक मंडळाने आटो डेबिट प्रक्रिया चालू केली. याचा फायदा पतसंस्थेच्या झाला भागभांडवल वाढले पण सत्ताधारी संचालक मंडळातील पन्नास टक्के संचालक सेवावृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने या सताधारी संचालकांचा पतसंस्थेतून फक्त वेगवेगळ्या माध्यमातून पैसे काढण्याचा प्रयत्न चालू आहे. नोकर भरती नंतर लगेच वरिष्ठ वेतनश्रेणी जी की बारा वर्षे सेवा झाल्यानंतर लागू करण्यात येते परंतु ती लगेच सहा महिन्यात लागू का केली.? यासह अनेक विषयावर जाब विचारण्यासाठी सभासद मोठ्या संख्येने वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित होते. परंतु पतसंस्थेचे चेअरमन, सचिव यांनी सभासदांना विश्वासात न घेता आपल्या वर्षभरातील कामकाजाच्या मंजुरीच्या अनुषंगाने चर्चा न करता, ठराव संमत करण्याचा प्रयत्न करत असताना उपस्थित सभासदांनी विरोध करत ही सभा उधळून लावली. व एकही ठराव संमत न करता प्रचंड गदारोळामध्ये ही आमसभा संपन्न झाली. द्वितिय सत्रातील फक्त दोन विषयावर चर्चा झाली उर्वरीत विषयावर चर्चा न करताच सताधारी संचालक मंडळानी सभेतून काढता पाय घेतला.
जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघाची आमसभा चालू असताना याचे पालन न करता सदरील आमसभेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये व तसेच सभागृहातील स्टेजवरील बॅनरवर एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे नाव व इतरही काही नावे या बॅनर वर प्रकाशित करण्यात आली व त्यांची उपस्थिती सुद्धा या वार्षिक सर्वसाधारण सभेत होती. त्यामुळे अशा या नियमबाह्य कायद्याचे पालन न करणाऱ्या सताधारी संचालकांनी आचारसंहीते या भंग केला. विभागातील सहकार निबंधक सहकार आयुक्त व सहकार मंत्री यांच्याकडे तक्रार करण्यात असल्याची माहिती विद्यमान संचालक प्रल्हाद राठोड, संतोष आंबुलकर ,संजय कोठाळे, शिक्षक परिषदेचे राज्य प्रवक्ते दत्तप्रसाद पांडागळे, विभागीय उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, विभागीय कार्याध्यक्ष बालाजी बामणे ,विभाग उपाध्यक्ष अजित केंद्रे,जेष्ठ सभासद दिगंबर मांजरमकर, चंद्रकांत गोंड,शंकर बेळकोणे, वैजनाथ मिसे,शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर हसगुळे, माध्यमिक जिल्हाध्यक्ष डॉ. वैजनाथ हंगरगे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत कुणके, समता पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन आनंद पवार निवघेकर,शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यालयीन सचिव बळवंत मंगनाळे, जिल्हा कोषाध्यक्ष धोंडीबा पांडागळे,शिक्षक परिषदेचे जिल्हा प्रवक्ते रवि ढगे, जिल्हा वरिष्ठ कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार, मिथुन मंडलेवार, विश्वनाथ पाटील, अशोक पाटील सुकनुरकर,संजय मोरे,जिल्हा उपाध्यक्ष संगमेश्वर पडलवार, बसवंत हाळदे, महेश पाटील,देविदास टाले, जलील मोमीन,विरभद्र हसनाळे, बालाजी राठोड, रत्नाकर केंद्रे बालाजी गुंडाळे, विठ्ठल मुखेडकर आदीणी दिली.
No Comment! Be the first one.