लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
मुखेड तालुक्यातील शिवाजी सर्विस स्टेशन शुगर युनिट (बाऱ्हाळी ) कारखान्याला ऊसाला प्रतीटन 3500 रुपय भाव देण्याचे आदेश द्या.ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ना नफा ना तोफा तत्वावर प्रत्येकी 50 किलो साखर द्या.ऊस तोड कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ करा अन्यथा ऊस शेतकरी व ऊस तोड कामगारांसह भाव वाढीसाठी आंदोलन करणार असा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व शेतकरी नेते शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी शेकडो शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयाल 9 आक्टोबर शुक्रवार रोजी निवेदनातून दिला आहे.
शिवाजी सर्व्हिस स्टेशन शुगर युनिट कडून शेतकऱ्यांच्या ऊसाला अत्यंत कमी भाव दिला जात आहे. बाजूचे 25 किलोमीटर अंतरावरील व इतर साखर कारखाने चांगला भाव देत आहेत. मात्र,शिवाजी शुगर युनिट शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव देतांना FRP चे पालन करत नाही, बाजूच्या साखर कारखान्याप्रमाणे किंवा इतर साखर कारखान्याप्रमाणे ऊसाला भाव देत नाही.त्यामुळे परिसरातील ऊस शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.कारखाना टिकला पाहिजे. पण,शेतकऱ्यांवर अन्याय करून नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाला FRP प्रमाणे भाव मिळाला पाहिजे. शिवाजी सर्व्हिस स्टेशन शुगर युनिटला 2026 या चालू वर्षी ऊसाला प्रतीटन 3500 रुपय भाव द्या, ऊस तोड कामगारांच्या मजुरीमध्ये वाढ करा आणि ऊस पूरवठादार शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा तत्वावर प्रत्येकी 50 किलो साखर जाहीर करायला सांगा,अन्यथा ऊस शेतकरी व ऊस तोड कामगारांसह आंदोलन करण्यात येईल याची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी मागणी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत प्रशासनाकडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
No Comment! Be the first one.