लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : फिनिक्स स्पोकन इंग्लिश क्लासेसचे संचालक मोहन शिवराम कोरडे (६०, रा. उस्मानपुरा) यांनी मंगळवारी (६ ऑक्टोबर) सिडको एन-१ येथील क्लासमध्ये विष प्राशन केले. उपचारादरम्यान बुधवारी पहाटे मिनी घाटी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला.
कोरडे यांच्या पत्नी सुनीता यांच्या तक्रारीवरून विजय रामचंद्र सांगवीकर, सुधा प्रभाकर साने, उद्धव राऊत आणि संतोष जाधव यांच्याविरुद्ध सिडको एमआयडीसी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, २००६ मध्ये दुकानांच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप असून, त्यानंतर न्यायासाठी अनेक वर्षे पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई झाली नाही. तसेच ५० लाखांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोरडे यांच्याकडून बॉण्ड व कोरे धनादेश घेतल्याचाही आरोप आहे. घरावरील कर्जाची थकबाकी आणि जप्तीच्या नोटिशीमुळे ते आर्थिक विवंचनेत होते.
आत्महत्येपूर्वी कोरडे यांनी तीन पानी सुसाइड नोट लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यात न्यायासाठी केलेल्या पाठपुराव्याचा आणि संबंधित व्यक्तींविरोधातील आरोपांचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
No Comment! Be the first one.