महापालीका प्रशासन व गाळेधारकांची बैठक
लोकार्थ प्रतिनिधी प्रविण देशपांडे परभणी
परभणी महानगरपालिकेच्या जलतरणिका आणि जिल्हा क्रीडा संकुलातील गाळेधारकांच्या भाडेवाढ व इतर मागण्याबाबत येत्या पंधरा दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन उपायुक्त तुकाराम कदम यांनी गाळेधारकांच्या बैठकीत दिली.
जलतरणीका आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या गाळेधारकांची बैठक बी रघुनाथ सभागृहात बुधवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता पार पडली. यावेळी उपायुक्त तुकाराम कदम यांनी गाळे धारकांचे प्रश्न समजावून घेतले. महापालिकेने गाडी धारकांना थकबाकी बाबत नोटिस बजावली आहे. या नोटीसा दिल्यानंतर ही बैठक घेण्यात आली. सन 2019 पासून थकलेली रेडीरेकनरनुसार वाढीव भाडे वसूल करण्यासाठी महापालिकेने नोटीस दिली बजावली आहे. यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाळे धारकांनी काही मागण्या मांडल्या. थकबाकीमध्ये सूट देण्यात यावी, त्यासोबतच भाडेकरार हा 29 वर्षाच्या कराराप्रमाणे द्यावा, जलतरणीका आणि जिल्हा क्रीडा संकुलाच्या नूतन इमारतीमध्ये जुन्या गाळेधारकांना प्राधान्य द्यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्यावर उपायुक्त तुकाराम कदम यांनी सांगितले की आपल्या मागण्यांवर महानगरपालिका प्रशासन विचार करेल, याबाबत महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर यांच्यासोबत बैठक घेऊन येत्या पंधरा दिवसात निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी मालमत्ता व्यवस्थापक भगवान यादव, लिपिक मोहम्मद हरून, माहिती जनसंपर्क अधिकारी राजकुमार जाधव सह गाळेधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No Comment! Be the first one.