AIMIM नगरसेवकांचा आयुक्त, महापौरांना घेराव; गटनेत्याला कार्यालय देण्याची मागणी
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
दुष्काळाच्या परिस्थितीत महानगरपालिकेच्या निधीतून आलिशान गटनेता कार्यालयासाठी मोठा खर्च केल्याचा आरोप करत AIMIMच्या नगरसेवकांनी बुधवारी (३० सप्टेंबर) मनपा आयुक्त व महापौरांचा घेराव घातला. वंचित बहुजन आघाडीच्या गटनेत्यासाठी जवळपास एक कोटी रुपये खर्च करून कार्यालय उभारण्यात आले असून, मुख्य विरोधी पक्षाच्या गटनेत्याला मात्र मागील आठ महिन्यांपासून स्वतंत्र कार्यालय देण्यात आलेले नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला.
महापालिकेच्या निधीचा वापर पाणी, स्वच्छता, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी करण्याची मागणी करत AIMIM नगरसेवकांनी या कथित दुजाभावाचा निषेध केला. विरोधी पक्षाच्या गटनेत्याला तातडीने कार्यालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते समीर साजिद यांनी केली.

No Comment! Be the first one.