44 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
बालाजी वाईजळे (लोकार्थ नांदेड )
ग्रामीण पोलिसांनी महसूल विभागाच्या सहकार्याने मोठी कारवाई केली असून वाहेगाव व मार्कंड शिवारातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येणारे 44 लाख 66 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून साधनसामग्री जप्त या प्रकरणी सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांनी अवैध वाळू उपसा करण्याचे साहित्य जिलेटीन स्फोटात उध्वस्त केले आहे.
ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक व्यंकटेश कुसमे व त्यांचे सहकारी वाजेगाव परिसरात गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, सिद्धू बालीसिंग महाराज हा आपल्या मजुरांच्या मदतीने मार्कंड व वाहेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात बोटी, तराफे व इंजिनच्या साहाय्याने अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत आहे. त्यावेळी पोलिसांनी दोन पंचांना सोबत घेऊन पहाटेच्या सुमारास नदीपात्रात अचानक धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच वाळू उपसा करणारे तीन मजूर नदीपात्रात उड्या मारून पोहत पलीकडील किनाऱ्याकडे पळून गेले, तर दोन मजुरांना पोलिसांनी घटनास्थळीच ताब्यात घेतले आहेत. त्यात सिद्धू बालीसिंग महाराज (फरार ), महेश कुमार सनब शिवनाथ, राम मनोजकुमार पि पप्पू गुंड व इतर तीन अनोळखी मजूर पाण्यात उड्या मारून पसार झाले आहेत.
पोलीसांनी घटनास्थळावरुन 1 मोठी लोखंडी बोट, 2 लहान लोखंडी बोटी, 2 इंजिन, 5 तराफे, 20 लोखंडी पाईप, 10 प्लास्टिक ड्रम, 10 ब्रास वाळू, असा 44 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर अवैध वाळू उपसा करणारे साहित्य जिलेटीन स्फोटात उध्वस्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यापैकी बोटी, तराफे, इंजिन, पाईप व प्लास्टिक ड्रम हे गॅस कटर मशीनच्या साहाय्याने कापून, जाळून व पाण्यात बुडवून नदीपात्रातच जागीच निष्कासित केले आहे.ज्ञआरोपीविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामिण पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोलीस उपनिरीक्षक व्यकंट कुसमे व पथकातील पोलीस अंमलदार विठ्ठल भिसे, गफार शेख, कल्याणकर, टिपर्से, पवार यांनी पार पाडली.
No Comment! Be the first one.