‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा” शोमधून धमाकेदार टीव्ही डेब्यू!
लोकार्थ: क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीने आणि नेतृत्वाने जगभरातील चाहत्यांना भुरळ घालणारा भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आता मनोरंजनाच्या खेळपट्टीवर अवतरला आहे.

रोहित शर्माने होस्ट (सूत्रसंचालक) म्हणून छोट्या पडद्यावर धमाकेदार पदार्पण (टीव्ही डेब्यू) केले आहे.
१९ सप्टेंबर २०२६ पासून त्याचा “फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा” (Family Full House with Rohit Sharma) हा नवीन रिअलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
पहिल्याच एपिसोडपासून या शोला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून, रोहितची मिश्किल आणि बिनधास्त शैली प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे.
मैदानातील ‘हिटमॅन’ आता टीव्हीवरही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे.
No Comment! Be the first one.