श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; ६७ किलो वजन गटात नेत्रदीपक कामगिरी
लोकार्थ प्रतिनिधी विजय बनसोड
गंगापूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व बंकटस्वामी महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो क्रीडा स्पर्धेत श्री मुक्तानंद महाविद्यालयाच्या सारिका घोटकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक पटकावले. ६७ किलो वजन गटात तिने मिळविलेल्या या यशामुळे महाविद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
सारिका घोटकर हिच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामराव चव्हाण यांनी तिचे अभिनंदन केले. खेळाडूंचे कठोर परिश्रम, शिस्तबद्ध सराव आणि जिद्द यांच्या जोरावर हे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सारिका हिला महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. फिरोज सय्यद, सचिन हजारे, अरविंद खाजेकर व कोमल बाराहाते यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. लक्ष्मणराव मनाळ, कॅप्टन प्रशांत माने, सुवर्णाताई जाधव, संतोष अंबिलवादे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सारिकाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सारिका घोटकर हिच्या सत्कारप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. वैशाली बागुल, डॉ. बी. टी. पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विशाल साबणे, प्रबंधक डॉ. विजय आहेर, पर्यवेक्षक डॉ. हरिराम सातपुते व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख डॉ. फिरोज सय्यद उपस्थित होते.

No Comment! Be the first one.