
बॉलिवूड, राजकीय क्षेत्रात खळबळ
मुंबई : दिशा सालियान (Disha Saliyan) हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय अन्वेषण विभागाने अखेर या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. ५ वर्षांनंतर या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू झाल्यामुळे राजकीय आणि बॉलीवूड वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
अभिनेता सुशांतिसंग राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियानचा मृतदेह ८ जून २०२० रोजी संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्यानंतर काही दिवसांतच सुशांत सिंग राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. सुरुवातीला मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद केली होती. मात्र, हायकोर्टाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी हायकोर्टाने थेट सीबीआयला एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
दिशाच्या वडिलांचा मोठा गौप्यस्फोट; बड्या नावांचा उल्लेख
हायकोर्टाच्या निर्णयानंतर दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी सीबीआय अधिकाऱ्यांची भेट घेऊन सर्व परिस्थितीची माहिती दिली आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, माझ्या मुलीसोबत जे काही घडले ते मी तंतोतंत अधिकाऱ्यांना सांगितले. तपासादरम्यान मी आदित्य, सूरज पांचोली, डिनो मोरिया आणि बॉडीगार्डची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यांनी सर्व माहिती नोंदवून घेतली असून लवकरच कारवाईचे आश्वासन दिले आहे.
या नवीन घडामोडीनंतर सुशांतची बहीण श्वेता सिंग कीर्ती हिने समाजमाध्यमावर व्हिडिओ शेअर करत प्रतिक्रिया दिली. श्वेता म्हणते, सत्यामध्ये स्वतःची एक ताकद असते. सत्य काही काळासाठी दाबले जाऊ शकते, पण त्याला कधीही हरवले जाऊ शकत नाही.
No Comment! Be the first one.