राष्ट्रीय एकात्मतेचे ठरणार प्रतीक. भैय्याजी जोशी यांच्या हस्ते आज जालन्यात मंदिराचे लोकार्पण
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे
जालना शहरालगत असलेल्या नंदापूर येथे उभारण्यात आलेल्या भव्य भारत माता मंदिराचा लोकार्पण सोहळा आज, सोमवार, २८ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांच्या हस्ते दुपारी ४ वाजता हा सोहळा संपन्न होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक घनश्यामदास गोयल उपस्थित राहणार आहेत.
भारत माता मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना सद्गुरू ह.भ.प. डॉ. भगवान बाबा आनंद गडकर यांनी सांगितले की, नंदापूर येथे समृद्धी महामार्गालगत श्री भारत माता मंदिराची उभारणी करण्यात आली आहे. या भव्य वास्तूच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, यामध्ये भारत मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि मंदिराचे लोकार्पण भैय्याजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे. हे मंदिर भविष्यात राष्ट्रीय एकात्मतेचे एक प्रमुख प्रतीक ठरेल.
१०० फुटांपेक्षा अधिक उंचीची भव्य वास्तू
मंदिर शिल्प अभ्यासक तथा ज्येष्ठ वास्तुतज्ज्ञ चंद्रप्रकाश शर्मा यांनी वास्तूविषयी माहिती देताना सांगितले की, सद्गुरू ह.भ.प. डॉ. भगवान महाराज आनंद यांच्या ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेतून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे.
या मंदिराची एकूण उंची १०० फुटांपेक्षा अधिक असून, भूस्तरावर सुमारे ४ हजार चौरस फुटांचे भव्य सभागृह बांधण्यात आले आहे. या सभागृहात नित्यपूजेसाठी भारत मातेची ५ फूट उंचीची भव्य मूर्ती स्थापित करण्यात येत आहे.
No Comment! Be the first one.