भारतीय कबड्डी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये एकाच दिवशी दोन सुवर्णपदकं जिंकली. महिला संघानंतर पुरुष संघाने इराणचा ४०-३४ असा पराभव करत दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावलं.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने एकाच दिवशी २ गोल्ड मेडल पटकावले आहेत. अंतिम लढतीत भारत आणि इराण हे दोन्ही बलाढ्य संघ आमनेसामने आले होते. भारतानं सलग दुसऱ्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलवर नाव कोरलं. पहिल्या हाफमध्ये भारतीय संघ थोडक्यात पिछाडीवर होता. पण दुसऱ्या हाफमध्ये भारतीय खेळाडूंनी दमदार पुनरागमन केलं आणि बलाढ्य इराणवर विजय मिळवला.
पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना रंगला. इराणने सुरूवातीपासून आक्रमक खेळ केला. पण त्यानंतर भारतीय संघाने दमदार पुनरागमन केलं. पण भारतीय खेळाडू दबाव कायम ठेवण्यात अपयशी ठरले. इराणने भारतीय संघाला ऑलआऊट करत १४-१३ ने आघाडी घेतली. ऑलआऊट झाल्यानंतर भारतीय संघाने पुनरागमन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण पहिल्या हाफच्या समाप्तीनंतर इराणचा संघ १८-१७ ने केवळ एक गुणाच्या फरकाने आघाडीवर होता.
No Comment! Be the first one.