लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
हिला आर्थिक विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर आणि बिडकीन पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (२९ सप्टेंबर) महिलांसाठी विविध विषयांवर मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली. सकाळी ११.३० ते १२ वाजेपर्यंत हा उपक्रम घेण्यात आला.
यावेळी महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबळी, लैंगिक छळ, विनयभंग तसेच सायबर गुन्ह्यांबाबत माहिती देण्यात आली. अश्लील संदेश किंवा फोटो पाठविणे, सोशल मीडियावर बदनामी करणे, फेक प्रोफाइल तयार करणे आणि मॉर्फ केलेले फोटो वापरणे यापासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले.
डिजिटल व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती देऊ नये, तसेच आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ क्रमांकाचा वापर करावा, असे मार्गदर्शन करण्यात आले. महिलांनी अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधून प्रशासनासोबत समन्वय ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले.

No Comment! Be the first one.