लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करावी, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बुधवारी (३० सप्टेंबर) पैठण गेट येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार व निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
निवडणूक प्रक्रियेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी आंदोलकांनी केली. निवडणूक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबाबत उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
भाकपचे जिल्हा सेक्रेटरी अॅड. अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक यावेळी उपस्थित होते. आंदोलकांनी विविध घोषणा देत आपला निषेध नोंदविला.
No Comment! Be the first one.