लोकार्थ प्रतिनिधी विजय चौधरी,खुलताबाद
जागतिक वारसा स्थळ असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्य आणि पावित्र्य अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याबरोबरच व्यापक स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले.
या विशेष मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, गटविकास अधिकारी गिरीश सोनार, गटशिक्षणाधिकारी गोरक्ष गाजरे, कृषी अधिकारी हणमंत बोयनर, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, तसेच पंचायत समितीचे कर्मचारी बचत गटातील महिला यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसराची स्वच्छता केली. परिसरातील रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी झालेले अतिक्रमणे प्रशासनाने हटविले. त्यानंतर परिसरात साचलेला कचरा गोळा करून अनावश्यक साहित्य हटवून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
घृष्णेश्वर मंदिर परिसरात तसेच वेरूळ लेणी परिसरात व्यावसायिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्याप्रकरणी तब्बल १५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. यावेळी उमेद च्या महिलांनी आता झाडू व कचरापेटी घेऊन स्वच्छता अभियानात उस्फूर्त सहभाग नोंदवला.
वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसरात देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक भाविक भेट देत असतात. त्यामुळे या परिसरात स्वच्छ सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने ही विशेष मोहीम राबवली. यावेळी नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे व स्वच्छता राखण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
या स्वच्छता मोहिमेत दीपक बागुल, ए. बी.बनसोड,
ग्रामपंचायत अधिकारी गंगाधर गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी भूषण रोजेकर, सुनीता मकरंद, सुनील बारबैले, देविदास चौधरी, सुप्रिया साळुंके, सुषमा पघळ, शिल्पा राऊत, अमोल शिंदे, अनिरुद्ध जोशी, तसेच तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘स्वच्छ वेरूळ सुंदर वेरूळ’ या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेत वेरूळ लेणी व घृष्णेश्वर मंदिर परिसराला नवा लुक मिळाला असून ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन स्थळांचे सौंदर्य जपण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने राबविण्याची गरज आहे.
– मिन्नू पी.एम.,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर.
No Comment! Be the first one.