लोकार्थ प्रतिनिधी
राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार/जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम) व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासनाने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, २०२३ जाहीर केली आहे. या नियमावलीनुसार सन २०२४-२५ व २०२५-२६ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू / व्यक्ती यांच्याकडून अर्ज मागववण्यात येत आहेत. १२ ऑक्टोबर, २०२६ ते १५ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज दाखल करता येतील. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link) मध्ये उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर १२ ऑक्टोबर, २०२६ ते १५ नोव्हेंबर, २०२६ या कालावधीत व १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी छत्रपती संभाजीनगर मुकुंद वाडकर यांनी केलं आहे.
No Comment! Be the first one.