लोकार्थ प्रतिनिधी विजय सोनवणे
भोकरदन : मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्याने कोरड्या दुष्काळाची तीव्रता वाढत असून, खरीप हंगामातील पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. पिकांसाठी केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता कमी झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर रोजी भोकरदन तालुक्यातील सिपोरा, बोरगाव, वरुड खुर्द आणि बरांजळा साबळे येथे भेट देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
No Comment! Be the first one.