लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
हिंगोली जिल्ह्यात ब्लॉक अध्यक्ष निवडीसाठी माजी खासदार अँड तुकाराम रेंगे पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील काही ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या अद्याप प्रलंबित असून, या नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष मा. अँड. तुकाराम रेंगे पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अँड. रेंगे पाटील यांनी तातडीने हिंगोली जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील संबंधित नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करावी आणि ब्लॉक अध्यक्ष पदासाठी योग्य नावांची शिफारस करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच स्थानिक पातळीवर सर्वसमावेशक चर्चा करून ब्लॉक अध्यक्षांची निवड करण्याच्या दृष्टीने ही जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
No Comment! Be the first one.