जिल्हा परिषदेच्या मैदानावर मल्लांच्या कुस्त्यांची लक्षवेधी दंगल
पंचक्रोशीतील वस्तादांच्या उपस्थितीने वाढवला उत्साह

छत्रपती संभाजीनगर, ऐकमेकांवर मात करत, धुळ चाटविणारे डावपेच अन् मल्लांच्या सहभागाने लक्षवेधी ठरलेला जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा आखाडा रविवारी (दि. २०) मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या मल्लांनी यावर्षी गाजवला. संभाजी पेठेतील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित या कुस्त्यांच्या दंगलचे उदघाटन महानगर पालिका स्थायी समितीचे सभापती अनिल मकरीये यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी माजी उपमाहापौर राजु शिंदे, विजय औताडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष हरिभाऊ हिवाळे पाटील, नगरसेवक गोकुळ मलके, नगरसेवक गणेश लोखंडे मुख्य मार्गदर्शक डॉ. हंसराज डोंगरे, संतोष जेजुरकर, यांची उपस्थिती होती. कुस्ती स्पर्धेच्या पुर्वीच पावसाने काही काळ सौम्य हजेरी लावल्याने कुस्तीपटूंचा आनंद द्विगुणीत होत या दंगलीला उत्साहात सुरुवात झाली. दहा रुपयांपासुन तर अकरा हजार रुपायांपर्यंत कुस्ती पटुंची दंगल यावेळी रंगल्याने शहरातील खेळाडुंनी या कुस्त्यांच्या दंगलीत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. चाळीसगाव (खान्देश ), हर्सूल, बेगमपुरा, आष्टी (जिल्हा बीड), चिकलठाणा, देवळाई, सातारा परिसर, पळशी, नायगाव, रसूलपुरा यासह जिल्हातील विविध ग्रामीण भागातील कुस्तीपटुंनी कुस्तीच्या आखाड्यात ऐकमेकांना चितपट करत कुस्तीचा आखाडा रंगवला. सण उत्सवाची परंपरा, संस्कृती जोपसणाऱ्या भव्य कुस्त्यांच्या दंगलीचे यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे पैलवान आणि पंचक्रोशीतील अंतराराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती पटू, पैलवान आणि वस्ताद हे होते. या कुस्ती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र दाते पाटील, दिनेश राजेभोसले, बाळासाहेब दानवे, विशाल दाभाडे, संदिप शेळके यांनी पुढाकार घेतला.

No Comment! Be the first one.