पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून विसर्जनाची व्यवस्था; उपमहापौर राजेश राऊत यांचे युवकांना आवाहन
लोकार्थ प्रतिनिधी राहुल मुळे – जालना
जालना शहरातील मोतीबाग तलाव परिसरातील जलकुंडात गणपती बाप्पाच्या विसर्जनाला आज शांततेत सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवाच्या सांगतेनिमित्त गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेशभक्त मोठ्या संख्येने विसर्जनस्थळी दाखल होत आहेत.
जालना महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, संपूर्ण विसर्जन प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.
दरम्यान, गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी येणाऱ्या युवकांनी पाण्यात उतरण्याऐवजी निर्धारित जलकुंडातच सुरक्षितपणे विसर्जन करावे, असे आवाहन जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत यांनी केले आहे.
गणेशभक्तांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शांततेत आणि सुरक्षित वातावरणात गणपती बाप्पाला निरोप द्यावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
No Comment! Be the first one.