टाकळी कुंभकर्ण येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार दुष्काळी परिस्थितीची पाहणी
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
परभणी, जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे २७ सप्टेंबर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. परभणी तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे सकाळी ११ वाजता ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती महापौर सय्यद इकबाल यांनी दिली आहे.
यावेळी आदित्य ठाकरे शेतकऱ्यांशी संवाद साधून पिकांची स्थिती, पावसाअभावी निर्माण झालेल्या अडचणी तसेच शेतीच्या नुकसानीची माहिती जाणून घेणार आहेत. या दौऱ्यात पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, आमदार डॉ. राहुल पाटील तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याची माहिती महापौर सय्यद इकबाल यांनी दिली.
No Comment! Be the first one.