नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दौर्यावर येऊन गेले होते आणि आणि त्यांनी दुष्काळाची पाहणी केली होती , आणि महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून संबंधित जिल्हाधिकार्यांना तत्काळ पिकांचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत . या तालुक्यानामध्ये पिक कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याचे , कृषी पंपांच्या चालू वीज बिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी , शेतकरी मजूर यांना अन्नधान्य पुरवठा , जनावरांना चारा, पिण्याचे आणि जनावरांसाठी पाणी या व्यवस्था करण्यात येणार आहेत.

२६५ तालुक्यांसाठी जाहीर केलेल्या उपाययोजना व सवलती
१.जमीन महसुलात सूट
२.पीक कर्जाचे पुनर्गठन
३. शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती
४. कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट — 7.5 हॉर्सपॉवरपर्यंत क्षमतेच्या वीजपंपाचे वीजबिल अगोदरच माफ करण्यात आले आहे.
५. त्यावरील वीजपंपांना सदर सूट लागू असेल.
६. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
७. रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे
८. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर
९. टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे
१०. शेतीवर अवलंबून शेतकरी/मजूर इत्यादींना अन्नधान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे
११. जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे
१२. जलसंधारणाची कामे सुरू करणे
१३. यापूर्वी निर्गमित केलेल्या शासन निर्देशाप्रमाणे पिण्याचे पाणी व जनावरांसाठी पाण्याचे नियोजन करणे.
No Comment! Be the first one.