दोन्ही तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या विरोधात शेतकरी संतप्त
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वाईजळे नांदेड
नांदेड – महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील २६५ दुष्काळी तालुक्यांची यादी घोषित केली असून त्यात नांदेड जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड तालुक्यांना वगळण्यात आले आहे. मुखेड व मुदखेड तालुक्यांत संतापाची लाट उसळली असून शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारी करत आहेत. जोपर्यंत हे दोन्ही तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश होणार नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या अहवालावरून शासनाने महाराष्ट्रातील २६५ तालुके घोषित केले आहेत. त्या यादीत नांदेड जिल्ह्यातील नांदेड, लोहा, कंधार, माहुर, किनवट, देगलूर, बिलोली, हदगाव हिमायतनगर, नायगाव, उमरी, धर्माबाद, अर्धापूर, भोकर या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भोकर विधानसभा मतदार संघातील मुदखेड व मुखेड विधानसभा मतदार संघातील मुखेड या दोन तालुक्यांना वगळण्यात आले आहे. भोकर विधानसभा मतदार संघाच्या आमदार श्रीजया चव्हाण व आमदार डॉ तुषार राठोड यांच्या विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड तालुक्यांना वगळण्यात आल्यामुळे शेतकरी व नागरीकात मोठी नाराजी निर्माण झाली आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या दोन आमदारांच्या मतदार संघातील कार्यक्षेत्रातील तालुके वगळण्यात आल्यामुळे या लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात मोठा रोष निर्माण झाला आहे. त्यांच्या विरोधात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड व मुदखेड तालुक्यांना वगळण्यात आल्यामुळे शेतकरी व नागरीक आंदोलन करण्याच्या तयारी आहेत. जोपर्यंत मुखेड व मुदखेड तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश करावा म्हणून आंदोलन करण्याच्या तयारी करत आहेत. तसेच काँग्रेस, शिवसेना उबाठा, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया
सन २०२६ च्या खरीप हंगामात ट्रिगर-१ लागू झालेल्या राज्याच्या ३४ जिल्ह्यातील ३५५ तालुक्यांपैकी एकूण २६५ तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या संकट काळात मदतीला धावून जाण्याचा शब्द राज्य सरकारने पाळला असून, या निर्णयामुळे २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना व सवलती लागू केल्या जातील.
नांदेड जिल्ह्यामध्ये १६ पैकी १४ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ म्हणजेच पावसाची तूट आणि खंडाचा निकष लागू झाला आहे. मात्र मुदखेड आणि मुखेड या दोन तालुक्यात ट्रिगर-१ लागू झाला नाही. त्यामुळे दुष्काळी तालुक्यांच्या पहिल्या यादीत त्यांचा समावेश नाही. मुदखेड व मुखेड या दोन्ही तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांप्रमाणेच दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे इतर निकषांच्या आधारे मुदखेड व मुखेड हे दोन तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पुढील यादीत समाविष्ट करावेत, अशी आमची मागणी आहे. या संदर्भात माझे प्रशासनाशी बोलणे झाले असून, या दोन तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही आग्रहपूर्वक पाठपुरावा करू.

No Comment! Be the first one.