लोकार्थ प्रतिनिधी कार्तिक राजगुरू कन्नड
डीजे आणि डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजात विसर्जन मिरवणुका निघत असताना जैतखेडा येथे एक वेगळाच आदर्श घालून देण्यात आला.
राजे संभाजी गणेश मित्र मंडळ यांनी डीजे-डॉल्बीला पूर्णपणे फाटा देत पारंपरिक पद्धतीने बाप्पाचे विसर्जन केले.
कन्नड येथील विश्वमाई वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकरी यांच्या सहभागाने टाळ-मृदंगाच्या निनादात, हरिनामाच्या गजरात आणि फुगड्या व पावल्या खेळाच्या ठेक्यावर संपूर्ण विसर्जन सोहळा अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. लहान-लहान वारकरी मुलांनी आपल्या पारंपरिक वेशात ठेका धरल्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
वारकरी संप्रदायाची परंपरा जपत, ध्वनी प्रदूषणाला आळा घालत केलेले हे विसर्जन सर्वांसाठी आदर्शवत ठरले आहे. या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
No Comment! Be the first one.