लोकार्थ प्रतिनिधी मदन पाटील हिंगोली
विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. भास्करराव रामराव बेंगाळ साहेब यांच्या वतीने वडील कै. रामराव किसनराव बेंगाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रसिद्ध भागवताचार्य ह.भ.प. रुपालीताई सवणे परतूरकर यांचे सुश्राव्य कीर्तन कोळसा येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.यावेळी गावातील व परिसरातील भाविक वारकरी संप्रदायातील नामवंत मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. पद्माकर बुवा पेवेकर, ह.भ.प. लक्ष्मण बुवा आमदरीकर, ह.भ.प. विठ्ठल महाराज शिंदे वटकळीकर, ह.भ.प. उल्लास महाराज वटकळीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वटकळीकर, ह.भ.प. केशवराव महाराज हुडी, ह.भ.प. जयराम महाराज दाताडा, ह.भ.प. रामेश्वर महाराज, ह.भ.प. मृदुंगाचार्य वैभव महाराज बांगर, ह.भ.प. यज्ञेश्वर महाराज वटकळीकर, ह.भ.प. बाबुराव महाराज, ह.भ.प. भानुदास महाराज, ह.भ.प. अशोक महाराज म्हाळसापुरकर, ह.भ.प. रेखाताई चिचांबाकर, ह.भ.प. सुभाष महाराज रिधोरा, ह.भ.प. जगन महाराज अंभोरे, ह.भ.प. कोंडबा महाराज रिधोरा, ह.भ.प. प्रभू महाराज आमदरीकर, ह.भ.प. शंकर महाराज तोंडे (चोपदार, कोळसा), ह.भ.प. झाडे महाराज रिधोरा ही सर्व वारकरी मंडळी उपस्थित होती.
भागवताचार्य ह.भ.प. रुपालीताई सवणे परतूरकर यांनी आपल्या मधुर वाणीतून समाजातील आजच्या जीवनशैलीमध्ये समाजाच्या हितासाठी कसा बदल घडवून आणला पाहिजे याविषयी प्रभावी समाज प्रबोधन केले. आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. तरुण मुला-मुलींनी समाजातील भान राखून वागले पाहिजे.देशाविषयी व कुटुंबाविषयी जबाबदारीने वागले पाहिजे” असा मौलिक संदेश त्यांनी दिला.
यावेळी विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. भास्करराव बेंगाळ साहेब, उपाध्यक्षा श्रीमती आनंदीताई बेंगाळ, सचिव श्री. अंकुशराव बेंगाळ, विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अभिषेक भैय्या बेंगाळ, डॉ.रोहिणीताई अभिषेक बेंगाळ, कवी पत्रकार श्री शिवाजीराव कऱ्हाळे, पत्रकार श्री प्रदीप वाघ, पत्रकार श्री ज्ञानेश्वर कांबळे, बेंगाळ परिवारातील सर्व सदस्य, विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गावातील महिला-पुरुष मंडळी व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम अत्यंत भक्तिमय व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.
No Comment! Be the first one.