युवामित्र फाउंडेशनची मनपा आयुक्तांकडे मागणी
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर, महानगरपालिकेच्या मालकीचे संत एकनाथ रंग मंदिर खाजगी कंत्राटदाराकडे देण्यात आले असून, हे कंत्राट तातडीने रद्द करून रंगमंदिर महापालिकेने स्वतः चालवावे, अशी मागणी युवामित्र फाउंडेशनने केली आहे.
याबाबत फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन अंभोरे यांनी मंगळवारी मनपा आयुक्त अमोल येडगे यांना निवेदन दिले. खाजगीकरणामुळे स्थानिक कलावंतांना अवास्तव भाडेवाढ आणि शुल्काचा सामना करावा लागत असून, अनेक कलावंतांनी रंगमंदिराकडे पाठ फिरवली आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
प्रशासकीय काळात देण्यात आलेले कंत्राट रद्द करून हा विषय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडावा आणि कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
No Comment! Be the first one.