लोकार्थ प्रतिनिधी
जरातजवळ अरबी समुद्रात गस्त घालणाऱ्या भारतीय टेहळणी पथकाने एका संशयास्पद बोटीला ताब्यात घेतले. या बोटीतून ५ पाकिस्तानी नागरिक तीन हजार कोटी रुपये किमतीचे हेरोइन आणि एमडी ड्रग घेऊन येत होते. त्यांना अटक करून भारतीय तटरक्षीय दलाने ड्रग जप्त केले. या कारवाईत गुजरात दहशतवादविरोधी पथकानेही मदत केली. जप्त केलेली बोट इराणी बनावटीची आहे. बोट पुढील तपासणीसाठी मुंबईला रवाना करण्यात आली आहे.

No Comment! Be the first one.