ठाणे : लोकार्थ प्रतिनिधी
मानपाड्यातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येच्या वेळी कार्यालयात व त्यानंतर प्रदीप यांना रुग्णालयात नेताना हजर असलेला त्यांचा मित्र पप्या शिंदे हा कटात सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कापूरबावडी पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणातील अन्य चार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी रात्री हत्या करण्यात आली. ते कार्यालयात बसलेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. याप्रकरणी त्यांचे नातेवाईक मंदार घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No Comment! Be the first one.