नवी दिल्ली : लोकार्थ वृत्तसेवा
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅसच्या किमतीत तब्बल 62.50 रुपयांची वाढ करून सरकारने महागाईच्या आगीत तेल ओतलं. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2,810 झाली आहे. तेलुगु गॅस कंपन्यांनी 19 किलो वजनाच्या सिलेंडरसाठी ही दरवाढ बुधवारी लागू केली. घरगुती गॅसच्या सिलेंडर मध्ये मात्र कोणतीही दरवाढ नसल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरचे दर 9.50 रुपयांनी वाढवण्यात आले होते.
अनेक माध्यमांनी केवळ ‘गॅसची दरवाढ’ या शीर्षकाखाली हे वृत्त दिल्यामुळे नेटकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. इराण-अमेरिका आणि युक्रेन-रशिया युद्धामुळे ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे.

No Comment! Be the first one.