२६४.८५ कोटींची रक्कम बँकेत जमा
लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६” अंतर्गत जाहीर झालेल्या तिसऱ्या यादीत परभणी जिल्ह्यातील २६ हजार ६३५ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २६४.८५ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये जमा करण्यात आली आहे.
राज्य शासनाने यापूर्वी परभणी जिल्हयातील आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांपैकी 52 हजार 583 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रुपये 408.06 कोटी इतकी रक्कम वितरित केली आहे.
आज दि. 1 ऑक्टोबर रोजी तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये परभणी जिल्हयातील एकूण 26 हजार 635 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रुपये 264.85 कोटी रक्कम जमा करण्यात आली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण 79 हजार 218 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये रुपये 672.91 कोटी इतकी रक्कम जमा झाली आहे.
उर्वरित आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांची रक्कमही लवकरच वितरित होणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजुनही आधार प्रमाणीकरण केलेले नाही, त्यांनी तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केलेले आहे.

No Comment! Be the first one.