बनावट विमान तिकीट बनवून सहा हजारांची फसवणूक
लोकार्थ प्रतिनिधी: विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : बनावट विमान तिकीट तयार करून त्याचा वापर केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात विलास लंबे (रा. मयूर पार्क) याच्याविरुद्ध कारवाई सुरू आहे.
२ ऑक्टोबर रोजी सकाळी चिकलठाणा विमानतळावर एक प्रवासी बनावट तिकीट दाखवून सीआयएसएफच्या तपासणीतून विमानतळात दाखल झाला. त्यानंतर इंडिगोच्या प्रणालीत तिकीट क्रमांकाची पडताळणी केली असता ते तिकीट यापूर्वी दुसऱ्या प्रवाशाने वापरल्याचे समोर आले.
याप्रकरणी ज्ञानेश्वर राऊत यांच्याकडून सहा हजार रुपये घेऊन त्यांच्या नावाचे बनावट तिकीट तयार करून ते वापरण्यास भाग पाडल्याची तक्रार करण्यात आली आहे. त्यानुसार एमआयडीसी सिडको पोलिसांनी बीएनएस कलम ३१८(४), ३३६(३) अन्वये गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक बिघोत तपास करीत आहेत.
No Comment! Be the first one.