लोकार्थ प्रतिनिधी –
अमेरिकेच्या ओहायो राज्यात ग्रेटर क्लीव्हलँड परिसरातल्या हिंदू मंदिरावर शुक्रवारी (दि. २ ऑक्टोबर) अज्ञात समाजकंटकांनी विटा फेकून हल्ला केला. यात मंदिराच्या खिडक्यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झालं. घटनेच्या वेळी मंदिरात पुजारी आणि भाविक उपस्थित होते, अशी माहिती ‘कोएलिशन ऑफ हिंदूज ऑफ नॉर्थ अमेरिका’ (कोहना) या संस्थेने दिली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
रिकमंड हाइट्सच्या श्री स्वामीनारायण वडतलधाम हिंदू मंदिरात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. हिंदू अमेरिकन फाउंडेशननं ‘एक्स’वर दिलेल्या माहितीनुसार, समाजकंटकांनी मंदिराच्या इमारतीवर विटा भिरकावल्या. या घटनेत कोणी जखमी झाले आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, स्थानिक पोलीस त्याचा तपास करत आहेत. एफबीआय आणि नागरी हक्क प्राधिकरणाशी संपर्क साधण्यात आला असून त्यांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे
No Comment! Be the first one.