अशोक चव्हाण यांनी दाखवली हिरवी झेंडी
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळ
नांदेड – विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या आंदोलनांवर भाजप नेते अशोक चव्हाण यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकार आवश्यक ती सर्व कारवाई करत असताना केवळ विरोधासाठी विरोध केला जात असून, देशात अराजकता आणि चुकीचा संदेश (नॅरेटिव्ह) पसरवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
परीक्षांच्या पेपरफुटी आणि मतदारयाद्यांमधील त्रुटींवर बोलताना चव्हाण म्हणाले की, “पेपरफुटीचे कोणीही समर्थन केलेले नाही, दोषींवर कडक कारवाई केली जात आहे आणि यंत्रणेतील त्रुटी दूर केल्या जातील. मतदारयाद्यांचे शुद्धीकरण नियमानुसार चालू असून विरोधक केवळ राजकीय फायद्यासाठी याचा बाऊ करत आहेत.”
अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार
No Comment! Be the first one.