लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
राज्यातील शेतकरी भीषण संकटाखाली असताना त्यांना सर्वतोपरी मदत करणे हे प्रत्येकाचे काम आहे. या स्थितीत विरोधकांनीही राजकारण न करता केवळ शेतकऱ्यांना मदत देण्याचा विचार करावा, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास देताना राजकारणासाठी इतर मोठी वेळ आहे, असेही राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही, असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सेवा कार्यकाळा निमित्त सेवा ही संकल्प हे ब्रीद घेऊन शिवसेनेच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम येथील स्टेडियम मैदानावर बुधवारी झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आ. सईद खान, आ. संतोष बांगर, माजी खासदार सुरेश जाधव संपर्कप्रमुख आनंद जाधव, जिल्हाप्रमुख आनंद भरोसे जिल्हाप्रमुख विशाल कदम, भास्करराव लंगोटे, राजू कापसे, गंगाप्रसाद आनेराव, माणिक पोंढे, माजी महापौर प्रताप देशमुख, प्रा.किरण सोनटक्के, सखुबाई लटपटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या कार्यकाळात सेवा हाच संकल्प राहिला असल्याचे सांगून या कार्यकाळात देश जागतिक पातळीवर मोठे स्थान मिळवू शकला असा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अनेक मोठे प्रकल्प व पायाभूत सुविधा यावर प्रकाश टाकला. त्याचबरोबर राज्यातील शेतकरी दुष्काळी स्थितीत असल्याची बाब पंतप्रधान मोदींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वास दिल्याचीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
यंदा पाऊस अभावी दुष्काळाच्या संकटात शेतकरी असल्याने राज्यातील मंत्रिमंडळाने बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करीत शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. दुष्काळाची जाहीर केला. मात्र हे संकटच मोठे असल्याने बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे, अशा स्थितीत बँकांचावसुलीसाठीचा तगादा थांबविणे, शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करणे ,त्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करणे याबाबतचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. कारण राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा असून त्यांच्या मदतीबाबत सरकार कुठलाही हात आखडता घेणार नाही, असे सांगताना लाडकी बहीण योजनेतही विरोधकांनी अनेक अडचणी निर्माण केल्या मात्र आपण ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असा विश्वास दिला. शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना सुरू करण्याबरोबरच त्यांच्या हिताच्या विविध योजना राबविले आहेत आगामी काळात केंद्राच्या मदतीने शेतकऱ्यांपर्यंत भरघोस मदत पोहोचवली जाईल, त्यामुळे या कसोटीच्या काळात खचू नका, टोकाची पाऊल उचलू नका, धीर ठेवा सरकार खंबीरपणे पाठीशी आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
आयोजक खासदार संजय जाधव यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांसाठी सातत्याने मदतीची भूमिका शिवसेनेने कायम ठेवली आहे. मात्र या जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न व रोजगाराचा प्रश्न या दुष्काळात महत्त्वाचा असून त्यासाठी राज्याने मोठी मदत द्यावी अशी मागणी करतानाच शहरातील नाट्यगृहाचा प्रश्न, क्रीडा संकुलाचा प्रश्न यावरही भर दिला. जिल्ह्यातील ६५ गावे पाण्यापासून वंचित असल्याने त्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी करताना यापूर्वी शेतकऱ्यांच्या मुला मुलींची मुला मुलींची विवाह सोहळे घेतले असून या दुष्काळात सुद्धा 500 विवाह लावून देणार असल्याचे जाहीर केले.
यावेळी महिलांना शिलाई मशीन व शालेय विद्यार्थिनींना सायकल चे वाटप करण्यात आले.
No Comment! Be the first one.