लोकार्थ प्रतिनिधी शरद मेहकरे लातूर
शिरूर अनंतपाळ : परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याने दैनंदिन कामकाजात उल्लेखनीय कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल दि. ५ रोजी पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या हस्ते शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याला प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपूर्वी दैनंदिन कामकाजाच्या मूल्यांकनात शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे १५व्या क्रमांकावर होते. त्यानंतर गेल्या महिन्यात तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतल्यानंतर, या महिन्यात थेट प्रथम क्रमांक मिळवत पोलीस ठाण्याने आपल्या कार्यक्षमतेची छाप पाडली आहे.
पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी, बीट अंमलदार व कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. या दमदार कामगिरीबद्दल पोलीस उपअधीक्षक अक्षय जाधव तसेच शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
No Comment! Be the first one.