झोहोचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचे आवाहन; अमेरिकेतील ग्रीन कार्ड धोरणावरून व्यक्त केली भूमिका
लोकार्थ प्रतिनिधी
अमेरिकेला आपली गरज राहिलेली नाही, भारतीय तंत्रज्ञांनी मायदेशी यावं, असं आवाहन झोहो कंपनीचे संस्थापक श्रीधर वेंबू यांनी केलं आहे. अमेरिकेनं परदेशी नागरिकांचं ग्रीन कार्ड गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून वेंबू यांनी हे आवाहन केलं. अमेरिकेनं अनेक भारतीय आयटी कंपन्या बरखास्त केल्या आहेत. ‘अमेरिकेकडून पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम’ (पीइआरएम) चालविला जातो. त्याअंतर्गत कंपन्याच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रीन कार्डची व्यवस्था करतात. या कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या भारतीय कंपन्या बंद करण्याचा सपाटाच अमेरिकेनं लावला आहे.

No Comment! Be the first one.