लाज कोणाला वाटावी कोमवाड यांना की, जिल्हा परिषदेच्या समकक्ष अधिकाऱ्यांना?
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे
नांदेड : जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी उत्तम कोमवाड हे गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर अर्धनग्न अवस्थेत भीक मांगो आंदोलन सुरू केले असून जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे लाज कोणाला वाटावी अशी चर्चा जिल्हा परिषद परिसरात सुरू आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांच्या न्याय मागण्या मान्य केल्या नाही तर उद्या १३ आकटोबर रोजी फक्त अंतर्वस्त्रावर ते भीक मांगो आंदोलन करणार असल्याचे सांगितले.
नांदेड जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी उतम कोमवाड यांनी त्यांच्या ७ व्या वेतन आयोगाची थकीत रक्कम देण्यात यावी म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाकडे चकरा मारत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश पाटील व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार हे त्यांच्या मागण्यांसंदर्भात ते टोलवाटोलवी करत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असलेल्या उतम कोमवाड यांना त्यांच्या समकक्ष अधिकारी वर्गाकडून मागण्या मान्य करण्यासाठी छळ सुरू आहे. त्या छळाला कंटाळून कोमवाड यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. उतम कोमवाड यांच्या आंदोलनाची जिल्हा परिषद परिसरात मोठी चर्चा सुरू असून लाज कोणाला वाटावी जिल्हा परिषद प्रशासन की उतम कोमवाड यांना अश्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
सेवानिवृत्त प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी उतम कोमवाड यांनी १२ आकटोबर रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर त्यांनी बरमुडा व बनियान घालून हातात भगोने घेऊन भीक मांगो आंदोलन करत आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी महेश पाटील व सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार यांनी त्यांचा प्रश्न तात्काळ सोडविला नाही तर १३ आकटोबर पासून फक्त अंतर्वस्त्रावर हातात भगोने घेऊन भीक मांगो आंदोलन करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने दखल घेतली नाही तर कोमवाड टप्प्याटप्प्याने आंदोलनात बदल करणार आहेत. कोमवाड यांच्या आंदोलनामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची इभ्रत वेशीवर टांगली जात आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासन त्यांची दखल घेत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
No Comment! Be the first one.