माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रयत्नांना यश; २६ व्या गळीत हंगामासाठी बॉयलर प्रदीपन, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण.
लोकार्थ प्रतिनिधी शरद गर्जे अष्टी
३ वर्षांपासून बंद असलेला महेश सहकारी साखर कारखाना अखेर पुन्हा सुरू झाला आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या प्रयत्नांतून कारखान्याच्या २६ व्या गळीत हंगामाची सुरुवात बॉयलर प्रदीपनाने करण्यात आली. यावेळी महंत विठ्ठल महाराज शास्त्री, चेअरमन अजय धोंडे, व्हाइस चेअरमन दादासाहेब जगताप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कारखाना पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
No Comment! Be the first one.