लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेतील कथित बेकायदेशीर बदलांच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. १३) क्रांती चौकात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी ‘ज्ञानेश कुमार गो बॅक’च्या जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. आंदोलक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांची धरपकड केली.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत मुख्य निवडणूक आयुक्तांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. एसआयआर प्रक्रियेतील कथित बदलांचा निषेध करत नागरिक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
या आंदोलनात अॅड. अभय टाकसाळ, दीक्षा पवार, प्राचार्य सुनील वाकेकर, प्रा. देवानंद वानखेडे, डॉ. लोकेश कांबळे, अॅड. दत्ता हूड, प्रा. गुणरत्न सोनवणे, मनीषा बल्लाळ, अरुण मते, अक्रम खान, अमरदीप हिवराळे, प्रा. अविनाश सावंत, रोहिणी नवले, पल्लवी बोराळकर, शीतल चोपडे आणि मोहित जाधव यांच्यासह अन्य आंदोलक सहभागी झाले होते.
No Comment! Be the first one.